बांदा,ता.१६: कास-शेर्ले सीमेवरील डिवाईन मर्सी येथे कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला सरपंचांच्या संयुक्त बैठकीत कडाडून विरोध करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारु देणार नाही असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. पंचक्रोशीतील मडूरा, शेर्ले, कास, इन्सुली, पाडलोस, निगुडे व रोणापाल ग्रामपंचायतीमार्फत सरपंचांच्या सहीचे निवेदन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
कास डिवाईन मर्सी येथे कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्याचा आदेश सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आरोग्य विभागाला दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेर्ले पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या या निर्णयाबद्दल पंचक्रोशीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे शेर्ले ग्रामपंचायत कार्यालयात पंचक्रोशीतील सरपंचांची तातडीची बैठक सरपंच जगन्नाथ धुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मडूरा सरपंच साक्षी तोरसकर, इन्सुली सरपंच पूजा पेडणेकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, कास सरपंच खेमराज भाईप आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वच गावच्या सरपंचांनी ग्रामस्थांच्या संतप्त भावना मांडल्या. कोविड केअर सेंटर उभारल्यास पंचक्रोशीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. कोविड केअर सेंटर उभारण्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत सेंटर उभारु देणार नाही. त्यासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्याचा निर्णयही घेण्यात आला. स्थानिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सरपंचांचे कोविड सेंटर उभारणीला विरोध असल्याबाबतचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना शुक्रवारी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. निगुडे व रोणापाल सरपंच यांनीही निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे
कास येथे कोविड केअर सेंटर उभारण्याला विरोध…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES