बांदा,ता.१६: अनधिकृत व्यवसायिक वराह पालनामुळे शेर्ले शेटकरवाडीतील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सदरचा व्यवसाय मानवी वस्तीपासून दूर करण्यासंदर्भात शेर्ले शेटकरवाडी ग्रामस्थांनी दोन साखळी उपोषण छेडले. अखेर पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी जोंधळे व सावंतवाडी गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
शेर्ले शेटकरवाडी येथील ग्रामस्थ महादेव धुरी, साईप्रसाद पेडणेकर, उत्तम पेडणेकर, संदिप पेडणेकर, देविदास परब, ताहीर सनदी यांनी अनधिकृत वराह पालन विरोधात शेर्ले ग्रामपंचायत आवारात साखळी उपोषण छेडले होते. वराह पालनाच्या दुर्गंधीमुळे शेटकरवाडी मधील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच भविष्यात श्वसनाचे त्रास उद्भवू शकतात. सदर बाब आरोग्य अधिकारी, पाणी व स्वच्छता अधिकारी, स्थानिक प्रशासन यांच्या निदर्शनास आणून यावर योग्य तो तोडगा काढावा यासाठी गेले दोन दिवस साखळी उपोषण छेडण्यात आले होते. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. एल. पाटील यांनी सर्व उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली.
संबंधित अधिकारी यांनी वराहपालन होत असलेल्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच उपोषणकर्त्यांना भेट देत १५ दिवसांमध्ये यामध्ये कायदेशीर बाबी पूर्ण करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपोषणकर्त्यांनी आपला व्यवसायाला विरोध नसून मानवी वस्तीपासून लांब असावा. जेणेकरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पंचायत समिती सभापती मानसी धुरी, जि. प. सदस्या उन्नती धुरी, सरपंच उदय धुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जोंधळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डी.पी. शिंपी, पशुधन विकास अधिकारी एस. बी. ठाकूर, गटविकास अधिकारी व्ही. ए. नाईक, ग्रामसेवक राजेश परब, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी उपोषणस्थळी भेट दिली. येत्या १५ दिवसांमध्ये कायदेशीर बाबींची पुर्तता करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अधिकारी यांनी दिल्यानंतर सुरु असेलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले
शेर्लेतील वराहपालनाच्या विरोधातील उपोषण आश्वासनाअंती मागे…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES