वेंगुर्ले तालुक्याचा बारावीचा निकाल ९६.२४ टक्के…

321
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिरोडा गोगटे ज्युनियर कॉलेजची दिव्या काकतकर तालुक्यात प्रथम…

वेंगुर्ले,ता.१६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९६.२४ टक्के लागला. तालुक्यात प्रथम येण्याचा मान गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा विद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या दिव्या काकतकर (९०.९२)टक्के हिला मिळाला .तर सर्वाधिक निकाल बा म गोगटे कनिष्ठ महाविद्यालयीन शिरोडयाचा लागला.यावेळीही तालुक्यात मुलींनीच बाजी मारली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातून ८२६ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकि ७९५ विद्यार्थी उत्तीर्ण होत तालुक्याचा निकाल ९६.२४ टक्के लागला. तर बॅ खर्डेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा व व्यवसाय आभ्यासक्रम ,बा म गोगटेचा विज्ञान व वाणिज्य व कला शाखेचा तर रा सी रेगे ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा,तर गुलाब ताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा स्वयंअर्थ सहाय्यीत विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला.
वेंगुर्ले तालुक्यातील शाळा निहाय निकाल वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालय या महाविद्यालयाचा ९४.६० टक्के निकाल लागला आहे. २७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयाचा विज्ञान विभागाचा शंभर टक्के निकाल लागला. या शाखेत ९३विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेत प्रथम दिप गवस (८०.७६)टक्के,द्वितीय सच्चिदानंद सामंत(७७.२३) टक्के,तृतीय नेहा मांजरेकर (७४.७६)टक्के,कला शाखेचा ८४.४४ टक्के निकाल लागला या शाखेत ४६ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून प्रथम तृप्ती परब (७६.९२)टक्के, द्वितीय रिद्धी साळगावकर (७५.२३)टक्के, तृतीय रेश्मा गोडे व मैथिली पालव (५८.४६)टक्के गुण मिळाले.वाणिज्य विभागाचा ९३.९७ टक्के निकाल लागला या विभागातून ८३ पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून प्रथम माधुरी गावडे (८४.३०)टक्के, द्वितीय ध्रुवी सावंत (८२.४६) टक्के तृतीय किरण गावडे व मयुरी परब (७८.९३)टक्के गुण मिळाले.व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल १०० टक्के लागला या विभागात ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून प्रथम प्रतिभा खोत (७८.९२)टक्के, द्वितीय सरोज जानवलकर व जान्हवी वाडकर (७२.७६)टक्के धनश्री धरणे (६९.०७)टक्के गुण मिळाले.
वेंगुर्ले पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे ज्युनियर कॉलेज येथे परीक्षेला बसलेल्या ११७ विद्यार्थ्यांमधून १०९ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९३.१६ टक्के निकाल लागला. या विद्यालयातून कला शाखा निकाल ८१.८२ टक्के लागला. या शाखेतून १९ पैकी ९ विद्यार्थी उतीर्ण झाले. या शाखेतून प्रथम यज्ञा बांदवलकर (६०)टक्के द्वितीय अक्षता कालेलकर (५७.६०)टक्के, तृतीय तुकाराम गावडे(५५.६०) टक्के गुण मिळाले.
वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के निकाल लागला.या शाखेतून ४६ विद्यार्थी उतीर्ण झाले.या विभागात प्रथम गीतांजली खानोलकर( ७८.९३) टक्के,द्वितीय सुहास माडये (७८.७७),तृतीय विद्या सातार्डेकर (७२.४६) टक्के. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा ९३.८३ टक्के निकाल लागला.या शाखेतून ३० पैकी २८ विद्यार्थी उतीर्ण झाले. या विभागात प्रथम रिझवान मुल्ला (७२.१५)टक्के, द्वितीय ऋतुजा तुळसकर (७०.१५)टक्के तृतीय रामचंद्र मांजरेकर व स्मिता वालावलकर (६८.७७) टक्के गुण मिळाले.
शिरोडा गोगटे ज्युनियर कॉलेज चा निकाल ९८.१४ टक्के लागला. या विद्यालयातून परीक्षेला बसलेल्या ३२३ विद्यार्थ्यांमधुन ३१७ विद्यार्थी उतीर्ण झाले. या विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला या शाखेतून १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेत प्रथम सुरज गावडे (७८.४६) टक्के, द्वितीय इंद्रायणी मोरजे, जान्हवी परब,निकिता गिरप (७७.८४)टक्के,तृतीय चिन्मय परब (७६.७६)टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला.या शाखेतून ९१ ही विद्यार्थी उतीर्ण झाले.या विभागातून प्रथम दिव्या काकतकर (९०.९२) टक्के ,द्वितीय मनाली दळवी ( ८४) टक्के,तृतीय पांडुरंग शिरसाट (८३.२३ ) गुण मिळाले. कला शाखेचा १०० टक्के निकाल लागला. या विभागातून ४५ विद्यार्थी उतीर्ण झाले. या शाखेतून प्रथम मीरा मामलेकर (८०)टक्के, द्वितीय पूजा दळवी( ७९.२३)टक्के, तृतीय संजना पालकर (६९.५३) टक्के मिळाले. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा ९२.५९ टक्के निकाल लागला. या शाखेतून ८१ पैकी ७५ विद्यार्थी उतीर्ण झाले. या प्रथम रघुराज टेमकर (७८.६१) टक्के द्वितीय जयेश सावंत (७८.१५)टक्के तृतीय (७४.६१) टक्के मिळाले.
वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय येथे परीक्षेला बसलेल्या १४१ विद्यार्थ्यांमधून १३२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या महाविद्यालयाचा ९३.६१ टक्के निकाल लागला. या महाविद्यालयात कला शाखेतून प्रथम पल्लवी जोशी (६९.२३) टक्के, द्वितीय सिद्धी सावंत (६७.५४) टक्के तर तृतीय रिद्धी सावंत व केशव धरणे (६०) टक्के मिळाले.वाणिज्य शाखेचा ९८.५७ टक्के निकाल लागला. या शाखेत प्रथम प्रयाग दामले (८९.५३) टक्के,द्वितीय हरेश वराडकर (८०.६१) टक्के तर तृतीय शुभा वेंगुर्लेकर (८०.३०) टक्के गुण मिळाले.तर स्वयंअर्थ सहाय्यीत विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला.या शाखेत प्रथम प्रिया पालव (८०.३१) टक्के. द्वितीय खुशी होळकर (७४.१५) तृतीय निवेदिता नाईक (७३.२३) टक्के गुण मिळाले.सर्व यशस्वी विध्यार्थी यांचे तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.

\