विक्रांत सावंत यांचा पुढाकार ; काही ग्रामपंचायतींना सॅनिटायझरसह मशीन वाटप
सावंतवाडी.ता,१७: आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून विक्रांत सावंत यांच्यावतीने आंबोली पंचक्रोशी तीन टन खत वाटप करण्यात येणार आहे.कोरोना काळात झालेली खताची टंचाई लक्षात घेता जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमिवर आंबोली,गेळे,चौकुळ,कुंभवडे,खडपडे गावात तीन टन खत वाटप करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला येथिल एसटी कामगार वाहक चालकांना सॅनिटायझर वाटप आणि सन्मान सोहळा,दाभोली,इन्सुली,देवसू,मळगाव, आदी ग्रामपंचायतील सॅनिटायझर वाटप तसेच कणकवली ग्रामपंचायत मध्ये थर्मल गन वाटप,तसेच दोडामार्ग पंचायत समिती मध्ये झाडे वाटप करण्यात येणार आहे.