ट्रक चालक पॉझिटिव्ह; आरोग्य प्रशासनाकडून दुजोरा
वेंगुर्ले,ता.१७:
वेंगुर्ले शहरात राहणाराऱ्या एका ट्रक चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याला तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी सामंत-माईणकर यांनी दुजोरा दिला आहे. आरोग्य विभागाने सदर भागात आरोग्य तपासणी तात्काळ सुरू केली आहे.
वेंगुर्ले तालुक्यात हा पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या पूर्वी चे सर्व चारही रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान वेंगुर्ले-भटवाडी भागात रहाणार हा रुग्ण कोल्हापूरचा असून तो येथे कामा निमित्त एकटा रहातो. दोन दिवसा पूर्वी त्याला ताप येऊ लागल्याने उपचारासाठी तो उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेला होता. मात्र त्याची प्रकृती जास्त बरी नसल्याचे लक्षात आल्याने येथे त्याला तपासणी साठी न घेता सरळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याचा स्वब रिपोर्ट काल रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह आहे.