ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्या विरोधात आंदोलन ; प्रांताधिका-यांना निवेदन
सावंतवाडी.ता,१७: ग्रामपंचायतीवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासक आदेशाच्या विरोधात आज येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी ठाकरे सरकार हटाव.. ग्रामपंचायत बचाव.., या सरकारचे चालले काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निषेधाचे पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष संदीप गावडे,जिल्हा संयोजक महेश सारंग, माजी सभापती पंकज पेडणेकर,रवी मडगावकर,राजू परब, निशांत तोरसकर,नगरसेवक मनोज नाईक,अशोक माळकर,गजानन गावडे,संदीप हळदणकर,अमित परब, सौरभ गावडे, मनीष परब, दीनानाथ कशाळीकर,सुधीर गावडे,भूषण गावडे,मनीष परब, नामदेव गावडे, सुभाष राऊळ,केतन आजगावकर पंचायत समिती सभापती मानसी धुरी,उपसभापती शितल राऊळ, नगरसेवक सुधीर आडिवरेकर,नासिर शेख, पुखराज पुरोहित आदी उपस्थित होते.