शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने झाराप-बायपास येथे वृक्षारोपण…

380
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.१७: मुंबई-गोवा महामार्गावर झाराप बायपास येथे शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या संघटनेच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान लाखोच्या संख्येने वृक्षतोड करण्यात आली आहे.परिणामी पूर्वी दुतर्फा झाड असल्याने हवेशीर असलेला महामार्ग आज उजाड झाल्यागत दिसत आहे.यासाठीच एक सामाजिक भान म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.दरम्यान ५ जुलै पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या संघटनेने ही वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहीम सुरू केली आहे.याअंतर्गत कणकवली (स्वराज्य सेने अंतर्गत),कसाल, ओरोस, पावशी, कुडाळ, बिबवणे आणि आज झाराप बायपास येथे वृक्षारोपण करण्यात आले.
मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा हिरवागार करण्यासाठी सर्व सिंधुदुर्गवासीयांना प्रयत्न करावे.राजकीय पक्ष, प्रशासन यांच्या भरवश्यावर न राहता सर्वांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनसाठी प्रयत्न करावे,असे आवाहन यावेळी शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले.
यावेळी प्रथमेश डिगसकर, रमाकांत नाईक, स्वरूप वाळके, स्वप्निल गोलतकर, विवेक बोभाटे, प्रथमेश धुरी, शंकर पंदारे, दैवेश रेडकर, महेश अडसुळे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

\