दोडामार्गातील लोकांना गोव्याच्या पेट्रोल पंपाची “वाट बंद”…

622
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांतून नाराजी ; जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर प्रवेश नाकारला…

दोडामार्ग.ता,१७: गोवा राज्याने तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोवा हद्दीत असलेल्या पेट्रोल पंपावर सिंधुदुर्गातील नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांचे हाल झाले आहे.परिणामी परिसरात नाराजी आहे.कर्फ्यू लावणे ठीक, परंतु पेट्रोल सारखी गोष्ट किमान नाकारू नका,त्या ठिकाणी जाण्यास विरोध करू नका,अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.त्यामुळे तीन दिवस चालणाऱ्या या बंदमध्ये गोवा सरकार नेमकी कोणती भूमिका घेते.याकडे आता दोडामार्ग वासियांचे लक्ष लागून आहे.

\