भंडारी समाजाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी रवींद्र तळाशिलकर…

315
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण ता.१७: येथील भंडारी समाज तालुकाध्यक्षपदी रवींद्र लक्ष्मण तळाशिलकर यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी बहुसंख्य असंघटीत भंडारी ज्ञाती बांधवांना एकत्रित करुन समाजाची ताकद वाढवण्यासाठी,तालुका संपर्क दौरा करून
भंडारी भवनाची निर्मिती पुर्णत्वास नेण्याचा संकल्प समाज बांधव व जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल,असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी बोलताना दिले.
मालवण भंडारी संघाचे अध्यक्ष लिलाधर गणेश हडकर यांच्या आकस्मिक निधना नंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.दरम्यान भंडारी ज्ञाती बांधवांच्या सभेत एकमुखाने श्री.तळाशिलकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष प्रदीप वेंगुर्लेकर,कार्यवाह पंकज शशिकांत पेडणेकर,खजिनदार यशवंत मिठबावकर ,सदस्य यतिन खोत ,मनमोहन वराडकर , राजु आंबेरकर ,राजु आचरेकर, तुळशीदास मयेकर, भालचंद्र कवटकर ,सागर हडकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी नंदु गवंडी , देवदत्त हडकर, यजुवेंद्र हडकर ,सचिन आरोलकर , उपस्थित होते .

\