आंबोली.ता,१७: येथील घाटात दरडीचा काही भाग रस्त्यावर कोसळला आहे.ही घटना पूर्वीचा वस देवस्थान पासून खाली दोनशे मीटरवर घडली.गेल्या चार ते पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाट असुरक्षित बनला असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आंबोलीतील वर्षा पर्यटन बंद असल्यामुळे आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात वर्दळ असली तरीही कोल्हापूर- बेळगावच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहतूककारांसाठी घाट मार्गातील दरडीचा धोका निर्माण झाला आहे.अशाच प्रकारे दरडी दगड पडून दोघांना यापूर्वी जीव गमवावा लागला होता.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित उपाययोजना करावी,अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
आंबोली घाटात दरडीचा काही भाग कोसळला…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES