संजू परब; त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार नाही…
सावंतवाडी,ता.१७: माजी उपनगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो या माझ्या आईप्रमाणेचं आहेत,त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेचा मला कोणताही राग नाही,त्यामुळे मी त्यांना कोणतेही प्रत्युत्तर देणार नाही,असे सांगत संजू परब यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या टीकेला “नो कॉमेंट” असे उत्तर दिले.
सावंतवाडीत खाजगी भागीदारीतून उभारत असलेल्या शंभर कोटीच्या प्रकल्पावरून शिवसेनेच्या पदाधिका-यांनी संजू परब यांच्यासह राणे कुटुंबियांना टार्गेट केले होते.नेमका हा प्रकल्प कोण आणतोय?,कोण यामागे आहे?,असा प्रश्न केला होता.तसेच नगराध्यक्ष संजू परब यांना जाब विचारला होता.आज यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,लोबो या माझ्या आईसारख्या आहेत.त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेवर मी कोणतेही प्रत्युत्तर देणार नाही का?, ही आमची भूमिका आहे. ती मागाहून जाहीर करू,शहराचा विकास झाला पाहिजे,या मताचा मी आहे.त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगरसेवक मनोज नाईक, परीमल नाईक,सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर ,अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.