अध्यक्षपदी पुरुषोत्तम खेडेकर,तर उपाध्यक्षपदी आनंद गावकर…
मालवण ता.१७: तालुक्यातील दशावतारी कलाकारांच्या अस्तित्वासाठी “पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघा” ची स्थापना करण्यात आली असून,या संघाच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम खेडेकर तर उपाध्यक्षपदी आनंद गावकर यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतची माहिती श्री.खेडेकर यांनी प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे, सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय संघाची स्थापना कलाकारांच्या अस्तित्वासाठी झाली आहे.त्या संघांची प्रेरणादायी संकल्पना लक्षात घेऊन मालवण तालुक्यातील दशावतारी कलाकारांसाठी ही संघटना स्थापन करण्यात आली.
या संघटनेच्या सचिव पदी विनायक येरागी,सहसचिव पदी विनोद सुरेश परब,खजिनदार पदी नितिन दिगंबर घाडीगांवकर,सल्लागार पदी अोमप्रकाश यशवंत चव्हाण.तर सदस्य म्हणून विराज भिवा माळगांवकर,प्रथमेश दिलीप परब,सुधीर जनार्दन तांडेल,स्वप्नील मेस्त्री,गुणाजी विश्राम घाडीगांवकर आदींची निवड करण्यात आली आहे.