गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील; राजेंद्र म्हापसेकरांची यशस्वी शिष्टाई…
दोडामार्ग,ता.१७: तालुक्यातून गोव्यात पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या दोडामार्ग येथील नागरिकांना शिथिलता देण्याचा निर्णय गोवा राज्य शासनाने घेतला आहे.यासाठी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.आज सकाळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दोडामार्ग येथील नागरिकांना तपासणी नाक्यावर अडवण्यात आले. जनता कर्फ्यू असल्याचे कारण सांगून गोव्याच्या पेट्रोल पंपावर प्रवेश बंदी करण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर श्री म्हापसेकर यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा केली.व पेट्रोल भरण्यासाठी शिथिलता द्यावी अशी मागणी केली. त्यांच्या मागणीचा आदर ठेवून गोव्याच्या पेट्रोल पंपावर प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार श्री म्हापसेकर यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच गोवा राज्याचे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.