सिंधुदुर्गनगरी.ता,१७: कुडाळ तालुक्यातील मौजे कुडाळ करंदिकर चाळ व लक्ष्मीवाडी येथील १०० मीटर परिघ क्षेत्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक ३० जुलै २०२० रोजी रात्री १२.०० पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ व ५८ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, १९५१ चे कलम ७१,१३९ तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.
कुडाळ येथील करंदिकर चाळ व लक्ष्मीवाडी येथे कंटेन्मेंट झोन….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES