धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०५८.४० मि.मी. पावसाची नोंद…
सिंधुदुर्गनगरी,ता.१७: तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये एकूण३५८.८४६० द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून, सध्या हे धरण ८०.२१ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात ३३.६० मि.मी. पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमात एकूण २०५८.४० मि.मी. पाऊस झाला आहे.
कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 60.7740 द.ल.घ.मी. म्हणजेच 62.00 टक्के पाणीसाठा आहे. वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पामध्ये 47.1200 द.ल.घ.मी. म्हणजेच 67.01 इतका पाणीसाठा आहे. तर देवगड तालुक्यातील कोर्ले-सातांडी प्रकल्प 100 टक्के भरला आहे.
लघू पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे द.ल.घ.मी. मध्ये असून कंसातील आकडे टक्केवारीतील आहेत. शिवडाव : 2.6480 (100), नाधवडे : 3.2819 (75.14), ओटाव : 3.5261 (75.34), देंदोनवाडी : 0.8440 (8.61), तरंदळे : 1.0030 (22.01), आडेली : 1.2880 (100), आंबोली : 1.7250 (100), चोरगेवाडी : 2.7830 (86.97), हातेरी : 1.9630 (100), माडखोल : 1.6900 (100), निळेली : 1.7470 (100), ओरोस बु. : 1.6260 (67.58), सनमटेंब : 2.3900 (100), तळेवाडी-डिगस 1.2860 (51.36), दाभाचीवाडी : 2.4210 (100), पावशी : 3.0300 (100), शिरवल : 3.6800 (100), पुळास : 1.5080 (100), वाफोली : 2.3070 (99.01), कारिवडे : 1.2840 (92.71), धामापूर : 2.3160 (94.88), हरकुळ : 2.3800 (100), ओसरगाव : 1.3390 (100), ओझरम : 1.8190 (100), पोईप : 0.8220 (70.68), शिरगाव : 0.6840 (43.24), तिथवली : 1.3660 (79.28), लोरे : 2.6960 (100).