वादात पडलेल्या काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीला अखेर प्रदेशची मान्यता….

314
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बाळा गावडेंची माहीती; सचिव गणेश पाटलांनी दिला हीरवा कंदील….

सावंतवाडी,ता.१७: प्रदेश कार्यकारिणीकडुन नव्याने जाहीर करण्यात आलेल्या आणि त्यानंतर वादात सापडलेल्या काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीला अखेर प्रदेशकडुन मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र प्रदेश सचिव गणेश पाटील यांनी दिले आहे. याबाबतची माहीती जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली.
दरम्यान यापुर्वी दिलेल्या पत्रावर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नोंद करण्यात आल्यामुळे ही कार्यकारिणी वादात सापडली होती. जुन्या पदाधिकार्‍यांनी आपल्याला नव्याने जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी मान्य नाही. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही, असे सांगुन वारंवार विरोध केला होता. काल मालवण येथे झालेल्या जुन्या कार्यकर्त्याच्या बैठकीत यावर पडसाद उमटले होते. मात्र,आज अखेर ही कार्यकारिणी अधिकृत आहे, असे पत्र देवून प्रदेशकडुन या वादाला पुर्णविराम देण्यात आला आहे.

\