गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका योग्यच…

621
2
Google search engine
Google search engine
Google search engine

काँग्रेसकडून स्वागत; कोरोना साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांना दर्शविला पाठिंबा…

सिंधुदुर्गनगरी ता.१७:  गणेश चतुर्थी निमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना बाबत तसेच कोरोना साथी बाबत जिल्हाधिकारी म्हणून आपण जो निर्णय घेतला आहे.त्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमटीने स्वागत केले आहे.त्यांनी जिल्ह्यातील कोविड १९ ही साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांना आपला पाठिंबा दिला असून याबाबतचे निवेदन जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, महेंद्र सांगेलकर, प्रदीप मांजरेकर विद्याप्रसाद बांदेकर आदी उपस्थित होते
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर रुजू झाले पासून आपण जे कोविड -१९ साथी
बाबत जे निर्णय घेतले ते सार्वजनिक दृष्ट्या हिताचे योग्य निर्णय घेऊन कोविड साथ नियंत्रणात
ठेवली. तसेच गणेश चतुर्थी निमित्त कोकणात येणारे चाकरमानी यांच्या बद्दल शासन स्तरावर आपण व आपले साथ देणारे सहकारी अधिकारी यांनी जो योग्य निर्णय घेतला आहे. त्याबद्दल
आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आपले व आपल्या सहकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन
करत आहोत. आपण घेतलेल्या निर्णयास सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सिंधुदुर्गच्या वतीने पार्टींबा
जाहीर करत आहोत.
गाव बांबड्डे तर्फे कळसुली हायवेवरील ब्रीजला ३ ठीकाणी ५ ते ६ मीटर व एका ठीकाणी जवळजवळ १५ ते २० मीटर रस्त्याच्या मधोमध भेग पडलेली आहे. व मातीचे भराव
खचलेले असुन ब्रीज धोकादायक बनलेले आहे. त्यामुळे त्यावरील वाहतुक बंद करावी. तसेच,
ओरोस जैतापकर कॉलनी कडील ब्रीजवर तलाव निर्माण झालेले असुन ब्रीजच्या खाली धबधबे
निर्माण झालेले आहे. ब्रीजची माती खरचत असुन ब्रीज पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच
साईड रोड खरचलेला आहे त्या टीकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.
भंगसाळ नदीवर घावनाळे गावी जाण्यासाठी बॉक्सवेल केलेला आहे. त्यामध्ये पुराचे पाणी जाते. त्यावरील काँक्रेटचा भाग खर्चलेला आह तेथे अॅक्सिडन्ट होण्याची शक्यता आहे. घावनळे गावी जाण्यासाठी भंगसाळ नदीवर जो भराव टाकलेला आहे तो या पावसाळयात वाहुन जाऊन समोरचा
घावनळे रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याच रोडच्या पुढे १४ गावे आहेत. तो प्रमुख जिल्हा मार्ग आहे. त्या टीकाणी कारपेट केलेले नाही. उतारावर बरेच मोटरसायकल घसरुन अंक्सिडन्ट झालेले आहेत.
कुडाळ आर एस एन हॉटेल समोर रस्ता मधोमध खचलेला आहे. त्याठीकाणी मीडलकट ठेवलेला
आहे त्या मीडलकट वरुन जाणारा रस्ता हा राज्य महामार्ग असुन, तो रस्ता पुढे कुडाळ एम आय डी सी, चीपी विमानतळ, कुडाळ बाजारपेट याकडे जातो. त्या रस्त्यावर कॅन्टर सारखी मोठी वाहाने एम आय डी सी मध्ये जातात. त्यामुळे त्या ठीकाणी मीडलकट ऐवजी सर्कल करण्याबाबत आपण वरीष्ट स्तरावर पाठपुरावा करुन सोई उपलब्ध करुन द्याव्यात.
राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराने नॅशनल हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. याला आरटी फॅक्टचे सुपरव्हीजन करणारी कंपनी जबाबदार आहे. हायवे टेकेदार यांनी सुपरव्हिजन करणारी
आरटी फॅक्ट कंपनीला मॅनेजकरुन हि निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे. तरी आरटी फॅक्ट कंपनीकडील सुपरव्हजनचा ठेका रद्द करण्याची शिफारस व त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची शिफारस केंद्रिय मंत्रालयाकडे करावी. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पहाणी दौरा करुन जे मुद्दे काढलेले आहेत त्याची
सोडवणुक करण्यासाठी प्रांताधिकारी तथा सक्षम प्राधिकारी कुडाळ व आपल्या जवळ पत्राने जे मुद्दे मांडलेल आहेत त्याची सोडवणुक आज पर्यंत झालेली नाही. त्या पत्राची प्रत आपल्या खात्याला सुद्धा देण्यात आली होती. त्याबाबत प्रमुख मुद्यावर चर्चा व्हावी.
तसेच, कुडाळचे प्रांताधिकारी रजेवर असुन त्याच्या जागी हजर झालेले प्रभारी प्रांताधिकारी कुठल्याही कामावर सह्या करत नाहीत. हायवेची भुसंपादन पेमेंट पूर्ण थांबवलेली आहेत.
तसेच रेखांकण बीनशेती प्रकरणे सुद्धा तशीच पड्न आहेत. तरी कृपया सदर अधिकाऱ्यांना योग्य
ती समज देण्यात याबी. कुडाळ तालुका भुमिअभिलेख कार्यालयात गेले वर्षभर उपअधिक्षक नेमणुक झालेली
नाही. प्रभारी अधिकारी महिन्यातून एकदा सुद्धा हजर नसतात, त्यामुळे मोजणी प्रकरणे, नकाशा
क.जा.प. पत्रके, आकार फोड़ पत्रके गेले बर्षभर पेंडींग आहेत. याबाबत योग्य त्या सुचना अधिक्षक भूमिलेख सिंधुदुर्ग यांना देण्यात याव्यात.
तसेच, कणकवली येथिल सत्यवान भगवंत मांजरेकर यांचे घर हायवे भुसंपादनात बाधित होत असुनं त्यांच्या घराच्या पुढच्या भागाचे मुल्यांकण केलेले असुन, त्यांना तेवढा भाग तोडण्याची नोटीस राष्ट्रीय महामार्गाचे उपविभाग सावंतवाडी यांनी नोटीस दिलेली आहे. याबाबत यापुवीच
सक्षम प्राधिकारी प्रांत कणकवली यांचे कोर्टात अपिल दाखल होते. त्या अपिल संदर्भात सक्षम प्राधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ यांचेकड़े मुल्यांकण बाबत विचारणा
केलेली होती. त्यांनी संपूर्ण घराचे मुल्यांकण द्यावे लागेल असे कळवीले होते. त्या संदर्भात सक्षम प्राधिकारी यांनी सदर प्रकरण मा. लवादाकडे पाठविलेले आहे. ते प्रकरण आपल्याकडे प्रलंबीत आहे. त्याबाबत कृपया लवकर निर्णय देण्यास विनंती आहे. तो पर्यंत घराचा काही भाग
काढल्यास संपुर्ण घर कोसळण्याची भिती आहे. तरी त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

\