मालवण ता.१७: प्राथमिक आरोग्य केंद्र,चौके व आरोग्यवर्धनी आंबेरी उपकेंद्र अंतर्गत आंबेरी,वाक,मळा,चौके,वाघवणे या महसुली गावात आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डाँ.रोहित यशवंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक वर्षे या गावातील ग्रामस्थांना उपचारासाठी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागत होते.तसेच खाजगी डाँ.आधार घ्यावा लागत होता.आंबेरी गावात चौके प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आंबेरी आरोग्यवर्धनी उपकेंद्र असल्याने चौके येथूनच सेवा पुरवली जात होती.मात्र या गावासाठी नुतन डाँ.रोहित शिंदे यांची नियुक्ती केल्याने आंबेरी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी डाँ. शिंदे यांचे स्वागत तसेच सरपंच सौ.साक्षी कांबळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.प.स. सदस्य श्रध्दा केळूसकर,ग्रामसेवक गणेश नलावडे, किशोर वाक्कर,आनंद गोसावी, आरोग्य सेवक आनंद वाईरकर, आरोग्य सेविका सोनाली सुतार, आशा सेविका अक्षता गोसावी,मेघा गोसावी, ग्रा.प.सदस्य, कर्मचारी वृंद,ग्रामस्थ उपस्थित होते.