फोँडा येथील चेक पोस्ट हलविण्याची कार्यवाही करा…

187
2
Google search engine
Google search engine
Google search engine

उदय सामंत; फोँडा तपासणी नक्याची केली पहाणी…

सिंधुदुर्गनगरी ता.१७: फोँडा येथील चेक पोस्ट हे बाजारपेठेच्या जवळ आसल्यामूळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.याचा विचार करता सदरचे चेक पोस्ट घाट पायथा येथे स्थलांतरीत करावे ,अशा सुचना पालकमंत्री उदय सामंत यानी आज दिल्या.पालकमंत्री श्री सामंत यानी आज फोँडा नक्याची पहाणी केली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, संदेश पारकर सतीश सावंत संजय पडते पोलीस अधिकारी यासह फोँडा गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी पोलीस दलाच्या अडचणी समजून घेऊन पालकमंत्री यांनी दूरध्वनीवरून थेट पोलिस अधीक्षक अशी चर्चा केली फोंडा येथील चेक पोस्ट करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांना थेट सूचना केल्या.

\