उदय सामंत; वैभववाडीत पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सूचना…
सिंधुदुर्गनगरी ता.१७: येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे,अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. वैभववाडी व देवगड तालुक्यातील आढावा बैठक आज वैभववाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली.त्या वेळी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी पालकमंत्री यांच्यासोबत वैभव वाढीच्या सभापती अक्षता डफळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत संजय पडते संदेश पारकर कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने तहसीलदार रामदास शेळके तालुका आरोग्य अधिकारी या सर्व पंचायत समितीचे सदस्य सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा सर्वात जास्त आहे असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की डॉक्टर व प्रशासन चांगले काम करत असल्यामुळे जिल्ह्याचा रिकवरी रेट चांगला आहे. त्याबद्दल त्यांचे मला कौतुक आहे. गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. राज्य शासनाकडून गणेशोत्सव संबंधीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच प्राप्त होतील. त्याप्रमाणे प्रशासनाने काम करावे वैभववाडी पंचायत समितीची नव्याने उभारण्यात आलेली इमारत लवकरात लवकर दुरुस्त करून वापरा पाण्याविषयी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कार्यवाही करावी. तसेच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ज्या काही दुरुस्त कराव्या लागणार आहेत त्या ठेकेदारांकडून करून घ्याव्या जोपर्यंत इमारतीचे काम पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत ठेकेदाराची अनामत रक्कम व शेवटचे बिल साधा करण्यात येऊ नये अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिल्या.
यावेळी पालकमंत्री यांनी वैभव वाडी व देवगड तालुक्यातील तोरणाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.