किसान कार्ड वाटप, संगणीकृत ७/१२ वितरण सोहळा…
वैभववाडी,ता.१७: पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेची कार्यशाळा व कार्ड वाटप आणी संगणीकृत ७/१२ वितरण सोहळा वैभववाडी येथे उद्या सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत, बँक संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पशुसंर्वधन किसान क्रेडीट कार्ड योजना अंतर्गत दुधाळ जनावरे, कुक्कुटपालन, शेळी पालन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. तर डिजिटल इंडिया लँन्ड रेकॉर्ड मॉडर्नाझेशन प्रोग्राम (DILRMP)अंतर्गत जमाबंदी आयुक्त आणि संचालक संगणीकृत ७/१२, ८अ सुविधा कर्जदार व शेतक-यांना विनात्रास विनाविलंब, सुलभ जलद जिल्हा बँकेमार्फत बँकेच्या तालुका शाखा व प्रधान कार्यालय येथे उपलब्ध होणार आहेत.