सर्वसामान्यांचे हक्काचे भाई;दीपक केसरकर वाढदिवस विशेष
सावंतवाडी ता २८:
पर्यटनाच्या माध्यमातून जिल्हाचा विकास झाला पाहीजे येथिल महीलांना युवकांना रोजगार मिळाला पाहीजे तळागाळातील लोकांची आर्थिक उन्नती झाली पाहीजे असे स्वप्न उराशी बाळगुन सर्वसामान्यांसाठी रात्र दिवस झटणार्या आणी जिल्हा विकासाचे सोनेरी स्वप्न पाहणार्या माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्यांच्या या अलौकीत कार्याबदद्दल बे्रकींग मालवणीच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा धावता आढावा….
सर्वसामान्यासाठी लाडके भाई हक्काचा माणूस अशा अनेक बिरुदावल्या मिरवत थोरामोठ्यासह सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेली व्यक्ती म्हणजे आमदार दिपक केसरकर म्हणावे लागेल,जन्माला येते वेळी तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेल्या दिपकभाईंनी नगराध्यक्ष ते आमदार राज्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली मात्र ते गरीब श्रीमंतासाठी हक्काचे भाई ठरले त्यांना कधीही आणी कुठेही हाक मारा त्याच्याकडुन नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल
एरव्ही एखादा लोकप्रतिनीधी यश आल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल होतो सर्वसामान्यांसाठी तो दुरचा ठरतो मात्र कोणताही बडेजाव न ठेवता जिल्हा विकासाचे स्वप्न उराशी बाळगुन त्यांनी आपल्या कार्याला सुरवात केली चांदा ते बांदा सारखी अभिनव योजना श्री केसरकर यांच्या कल्पक बुध्दीतून राबविण्यात आली ही योजना यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांनी ग्रामीण भागातील महीला युवक सबळ झालेले दिसतील हे निश्चित
केसरकर यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस सुध्दा सक्षम झाला पाहीजे स्वतःच्या पायावर उभा राहीला पाहीजे हे स्वप्न पाहीले या पाश्वर्र्भूमिवर विशेषतः सुमुद्रकीनार्यांना लागून असलेल्या घरात त्यांनी बेड अॅण्ड बे्रक फास्ट सारखी योजना राबविली समुद्र कीनार्यावर जाणारे रस्ते सुधारले अनेक वर्षापासुन जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर साधे डांबर सुध्दा पडले नव्हते त्या रस्त्यांना कोटयावधीचा निधी उपलब्ध करून दिला त्याच बरोबर जिल्ह्यातील मुले शिक्षणात मागे राहता नये यासाठी सायन्स सेंटर आणी स्पर्धात्मक परिक्षांचे शिक्षण देेणारी दालने उभी करून दिली ऐवढयावरच न थांबता सर्वसामान्य मच्छीमार जगला पाहीजे यासाठी त्यांनी मच्छीमारांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले अशा प्रकारे तळागाळातील लोकांसाठी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा उपयोग केला या काळात काही अधिकार्यांची मानसिकता नसल्यामुळे त्यांनी आणलेला कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च होवू शकला नाही ही वस्तूस्थिती आहे मात्र त्या परिस्थितीत सुध्दा त्यांनी जिल्ह्याचा विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगुन आपला प्रवास सुरू ठेवला आहे या सर्व प्रवासात त्यांना राजकीय विरोधक सुध्दा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असले तरी तळागाळातील लोकांच्या आर्शीवादामुळे आपण नक्कीच त्यावर मात करू असा केसरकर यांचा विश्वास आहे ते आता मंत्री नसले तरी आमदार आहे त्यांचा स्वभाव आणी राज्यस्तरावरील मंत्र्यांच्या ओळखी लक्षात घेता कोणतेही काम मंजूर करून आणण्याची त्यांच्यात धमक आहे त्यामुळे मंत्री असले तरी आणी नसले तरी केसरकर हे सर्वसामान्यांसाठी विकासाचा दिपक आहे अशा या नेत्याला आमच्या टिम कडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा