सिंधुदूर्ग जिल्हयासाठी गणेशमूर्तींच्या उंचीची अट शिथिल…

964
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालकमंत्री उदय सामंत ; खास बाब म्हणून निर्णय घेतल्याचा दावा

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१८: राज्य शासनाकडुन घरगुती गणेश मुर्तीच्या उंचीवरुन घालून दिलेल्या अटी अखेर शिथिल करण्यात आल्या आहेत.गणेश भक्तांची आणि मुर्तिकारांची मागणी लक्षात घेता,खास बाब म्हणून ही अट रद्द करण्यात आली आहे,असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.ते काल सायंकाळी उशिरा पत्रकारांशी बोलत होते.
राज्य शासनाकडुन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गणेश मुर्तीची उंची दोन फुटा पर्यतच असावी,असा दंडक घालण्यात आला होता.मात्र या ठीकाणी बनविल्या जाणार्‍या गणेश मुर्ती या चतुर्थीच्या दोन ते तीन महिने अगोदर बनविल्या जात असल्यामुळे त्या आयत्यावेळी दोन फुटाच्या मुर्ती आणायच्या कोठून,असा प्रश्न गणेश मुर्तीकारांतून व्यक्त करण्यात येत होता. तर याबाबत गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त करीत हा निर्णय रदद् करण्याची मागणी केली होती.त्यानुसार काल वैभववाडी येथे पालकमंत्री सामंत यांनी हा निर्णय सिंधुदूर्ग जिल्ह्यापुरता खास बाब म्हणून शिथिल केला आहे,असे जाहीर केले.त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील मुर्तीकामगारांसह गणेश भक्तांना होणार आहे.

\