पास्कोल राॅड्रीक्स यांच्यासह ग्रामस्थांचा ही मदतीसाठी पुढाकार…
मालवण,ता.१८: देवबाग येथील गरीब कुटुंबियांना येथील ग्रामस्थांनी आर्थिक मदत एकत्र करून घरावर छप्पर उभारण्यासाठी प्लास्टिक कापड चे वाटप केले गेली. चार दिवस संततधार पाऊस पडत असल्यामुळे घरांना धोका निर्माण झाला होता. त्यानुसार नव्याने घेण्यात आलेल्या ताडपत्री उषा चव्हाण व गणेश चोडणेकर या दोघांना देण्यात आल्या, तसेच संबंधित दोघांनाही ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सविता डायस आणि परिवार, पॅटरसन फर्नांडीस, मोतेस फर्नांडिस, पास्कोल रॉड्रिग्ज, बावतीस फर्नांडिस, गणेश वाईरकर, दिनेश सावंत, अल्बर्ट रॉड्रिग्ज, गजानन मांजरेकर, कार्लू लुद्रिक, शेखर मांजरेकर, पॅटरसन फर्नांडीस आदी उपस्थित होते.