राणे समर्थक विकास कुडाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश….

825
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.१८: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी काल अखेर शिवबंधन बांधले.यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष संदेश निकम आदी उपस्थित होते.
श्री.कुडाळकर हे राणेंच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. मात्र गेली काही वर्षे त्यांना राजकारणात डावलण्यात आले होते. त्यामुळे अंतर्गत धुसफुस लक्षात घेता, ते नाराज होते. त्यामुळे त्यांना प्रकीयेत आणण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांना शिवसेनेत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांना काल शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.दरम्यान श्री.पडते यांची कुडाळ तालुक्यात मोठी ताकद आहे. त्याचा फायदा पक्षाला होणार आहे. असा विश्वास यावेळी पदाधिकार्‍यांकडुन व्यक्त करण्यात आला.

\