लॉकडाऊनमुळे या मार्गावरील वाहतूक बंद; घाटमार्ग सुरू करण्याची प्रवाशांमधून मागणी
वैभववाडी/पंकज मोरे.ता,१८:
तालुक्यात सलग आठवडाभर कोसळणा-या पावसामुळे भुईबावडा घाटात दरडीचा काही भाग कोसळला आहे. मात्र प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुईबावडा घाट पूर्णतः बंद केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू करावी अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांमधून केली जात आहे.
तालुक्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार कोसळणा-या पावसामुळे रिंगेवाडीपासून सुमारे ३ ते ४ कि. मी. अंतरावर दरडीचा काही भाग कोसळला आहे. शिवाय ठिकठिकाणी छोटे मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भुईबावडा घाट पूर्णतः बंद केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. घाट मार्गातील वाहतूक सुरू करावी अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांमधून केली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.