मसुरकर जुवा बेट, देवबाग जिओ ट्यूब बंधाराप्रकरणी मालवण भाजपा आक्रमक…

309
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पतन विभाग अधिकाऱ्यांना घेराव; चौकशी होईपर्यंत बील देणार नाही, अशी हमी….

मालवण,ता.१८: तेथील मसुरकर जुवा बेटावरील बंधारा आणि देवबाग जिओ ट्युब बंधारा प्रश्न भाजपाने आक्रमक भूमिका घेत पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लोकवस्ती एकीकडे आणि बंधारा दुसरीकडे असा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता, जोपर्यंत चौकशी केली जात नाही. तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करणार नाही, अशी भूमिका संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

गेले अनेक दिवस हा बंधारा चर्चेत आहे. तर देवबाग येथील जिओ ट्यूब फुटल्याचा विषयही पंचायत समिती सभेत गाजत होता. या दोन्ही प्रश्नी आज भाजपा पदाधिकाऱ्यांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाब विचारला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विलास हडकर, बाबा परब, अवि सामंत, विक्रांत नाईक, भाऊ सामंत, संतोष कोदे, संतोष गावकर यासह मसुरे, देवबाग येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याची पाहणी केलात काय ?लोकांसाठी बंधारा मंजूर असताना लोकवस्ती सोडून बंधारा का बांधलात ? लोकांना आणि लोकांच्या घरांना संरक्षण देण्यासाठी बंधारा होता की माड बागायती वाचविण्यासाठी बंधारा होता ? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर यांनी केला. पावसाळ्यात लोकं जीव मुठीत धरून बेटावर राहतात. उद्या काही जीवितहानी झाली तर तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. बंधारा कुठे मंजूर होता, किती निधी होता, तो कसा बांधायचा होता याची सर्व माहिती आम्ही माहिती अधिकारात घेतलेली आहे. आज शासनाचा कोट्यवधी निधी फुकट घालवलात. जर हाच निधी त्या लोकांना दिला असता तर त्यांनी घरं तरी बांधली असती. दोन टोकाला बंधारा बांधलात, मग मधल्या जागेचे पैसे कोणी खाल्ले ? हा चुकीचा बंधारा असून ठेकेदाराला वाचवण्याचं काम पतन विभाग करत आहे. त्यामुळे ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी भाजपाने केली.

\