गितेश राउत; कोणत्याही पोलिस चौकशीला जाण्यास मी तयार ..
कणकवली ता.१८: आपण कणकवली येथे गाडी पार्कींग करीत असताना त्या ठीकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांने आपल्याशी उध्दटवर्तन करत मला शिवीगाळ केली.मात्र मी त्यांच्याशी कोणत्याही पध्दतीने उध्दट वागलेलो नाही.उलट त्यांना समजावण्याच्या प्रयत्न केला.त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.अशी प्रतिक्रीया खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांनी दिली आहे.
काल कणकवली येथे राउत व वाहतूक पोलिस कर्मचारी विश्वजित परब यांच्यात वाद झाला होता.यातून संबधित पोलिसांने राऊत यांनी आपल्याल घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याचा दावा केला होता. हा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.त्यानंतर राउत यांच्यावर जोरदार टिका झाली. त्याला श्री. राउत यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले.ते म्हणाले…