प्रमोद जठार; राज्य सरकारच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज,स्थानिक आमदारांनी पाठपुरावा करावा…
दोडामार्ग ता.१८: तालुक्यातील आडाळी गावात आयुर्वेदिक रिसर्च सेंटर होण्यास आयुष मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.मात्र राज्य सरकारने त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास ते त्या ठिकाणी होईल,अशी माहिती भाजपाचे राज्य सचिव प्रमोद जठार यांनी दिली.दरम्यान त्यासाठी येथील स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री जठार पुढे म्हणाले महाराष्ट्रातील पहिला व एकमेव प्रकल्प आहे. तसेच आयुर्वेदिक वनौषधीवर हे संशोधन करण्यात येणार आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुकाप्रमुख सुधीर दळवी, रमेश दळवी, प्रकाश कोरगावकर, संतोष नानचे, सुनील म्हावळणकर आदी उपस्थित होते.