आरोग्य यंत्रणेतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधणार…

100
2
Google search engine
Google search engine

अमित सामंत; रिक्त पदावर डॉक्टर,परिचारकांची नियुक्ती करण्याची करणार मागणी…

कुडाळ ता.१८:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अडचणी दूर करण्यात याव्यात,वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी,अशी मागणी आपण जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांकडे करणार आहे,अशी भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे मांडली.दरम्यान कोरोनाच्या काळात रिक्त असलेल्या पदावर एमबीबीएस होमिओपॅथिक आयुर्वेदिक डॉक्टरांची तसेच परिचारीकांची नियुक्ती करण्यात यावी,जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य रूग्णांना होईल,अशीही मागणी आपण करणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.