वेंगुर्लेत एसटी आगार वाहक- चालक कोरोना योध्यांचा सन्मान

358
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विक्रांत सावंतांचा पुढाकार; आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

वेंगुर्ला.ता.१८: सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग मतदार संघांचे आमदार माजी गृहराज्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्लेत एसटी आगारातील चालक- वाहक व कर्मचारी या कोरोना योध्याचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी आगार, तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर काही सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर व सॅनिटायजर स्टँड, मास्क देण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून आमदार केसरकर यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला येथे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्कप्रमुख शैलेश परब, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, गीतेश राऊत, रुची राऊत, विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, सभापती अनुश्री कांबळी, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, आबा कोंडस्कर, बाळा दळवी, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, सावंतवाडी महिला संघटक अपर्णा कोठावळे, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी सभापती सुनील मोरजकर, जिल्हा पदाधिकारी सचिन वालावलकर, गरसेविका सुमन निकम, संदेश निकम, श्वेता हुले, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, शहर समन्वयक विवेक आरोलकर आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम केक कापून दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर आमदार केसरकर यांनी मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे लाईव्ह येत उपस्थितांना धन्यवाद दिले. यावेळी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर वेंगुर्ला एसटी आगार येथे कोरोना काळात सेवा देणाऱ्या एसटी चालक वाहक यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वेंगुर्ला एसटी आगार, तुळस आरोग्य केंद्र व इतर सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर व सॅनिटायजर स्टँड चे वाटप करण्यात आले.

\