अंदाजे दीड लाखांचे नुकसान; नुकसान भरपाई मिळण्याची मागणी….
वैभववाडी.ता.१८: तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी सकाळी जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा गावठण येथील सुर्यंकांत रामचंद्र मोरे यांचा गोठा जमिनदोस्त होवून अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी भुईबावडा तलाठी यांनी पंचनामा केला आहे.
तालुक्यात सलग आठ दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. शनिवारी सकाळी जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा गावठण येथील सुर्यकांत रामचंद्र मोरे यांच्या मालकीचा गोठा जमिनदोस्त झाला आहे. यात त्यांचे अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान घटनास्थळी भुईबावडा तलाठी श्री. कदम, कोतवाल श्री. नारकर यांनी जावून पंचनामा केला आहे. श्री. मोरे यांनी दीड महिन्यापूर्वी तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत यांनी धोकादायक गोठ्याबद्दल कळवून देखील प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याचे नुकसानग्रस्त सुर्यकांत मोरे यांनी सांगितले.