केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कवठणी ग्रामपंचायत येथे थर्मलगनचे वाटप…

139
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१८: माजी राज्यमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत व युवासेना उपजिल्हा अधिकारी सागर नाणोसकर यांच्या माध्यमातून कवठणी ग्रामपंचायत येथे थर्मलगनचे वाटप करण्यात आले.
खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज मा. केसरकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. कवठणी येथील कार्यक्रमाला सरपंच- सौ.सुमन सुदन कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य‌‌ सदगुरु कवठणकर, साक्षी कवठणकर, तेजा कवठणकर, सावंतवाडी उप तालुका प्रमुख संतोष गोवेकर, विभाग प्रमुख आबा केरकर, उप विभागप्रमुख संदेश केरकर, सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, विभागीय संघटक संदेश कवठणकर, कवठणी शाखाप्रमुख यामेश्वर कवठणकर, उपशाखा प्रमुख सचिन कवठणकर, उदय पारीपत्ये, योगेश गोवेकर, ज्ञानेश्वर तुळसकर, समीर सावंत, सतीश पेळपकर, सतीश पेडणेकर, किरण कवठणकर, कमलेश कवठणकर, अरविंद सावंत, रामा कवठणकर, प्रदीप कवठणकर, आशाताई अश्विनी रेगे, पुनम कोरगावकर, वार्ताहार- परशुराम मांजरेकर, शिवसेना युवासेना महिला संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

\