Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"आठवणीतील वेंगुर्ला" या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न...

“आठवणीतील वेंगुर्ला” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न…

वेंगुर्ला. ता.१८:
संजय घोगळे यांचे आपल्या गावाप्रती असलेले प्रेम पाहून आपणास फारच कौतुक वाटले. त्यांनी यापुढेही वेंगुर्ल्याच्या अशा अनेक आठवणी पुस्तकरुपाने लोकांसमोर आणाव्यात अशी अपेक्षा प.पु.विनायक अण्णा महाराज यांनी ‘आठवणीतील वेंगुर्ला‘ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि मुंबई येथे प्रशासकीय सेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले संजय घोगळे यांच्या ‘आठवणीतील वेंगुर्ला‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पिगुळी येथील संत राऊळ महाराज मठात पार पडला. प.पु.विनायक अण्णा महाराज यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वेंगुर्ला येथील ‘किरात‘ प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
यशाची कमान चढत असताना जो आपला गांव, आपली माणसे, आपले हलाकीचे दिवस सदैव स्मरणात ठेवतो व आपल्या गावांबद्दल नेहमी अभिमान बाळगतो त्याला यश नेहमीच साथ देते. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून यशाची शिखरे पार करत उत्तुंग भरारी घेणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे हे त्यापैकी एक आहेत. प्रशासकीय सेवा बजावत असताना आपल्या गावच्या आठवणींना ‘आठवणीतील वेंगुर्ला‘ या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने उजाळा दिला आहे. या कार्यक्रमाला पत्रकार शेखर सामंत, सौ.बाई माँ, सुभाष घोगळे, जगदीश सापळे, माजी तहसिलदार अशोक पवार, प्रमोद तेंडुलकर, अण्णा महाराज यांचे सुपुत्र विठोबा राऊळ, राऊळ महाराज सेवा ट्रस्टचे माजी लेखनिक प्रभाकर भाईप, अनिल होडावडेकर, दिनेश ठाकूर, ट्रस्टच्य मुख्य कार्यकारी अधिकारी भारती सावेकर, छाया भाईप, रश्मी भाईप, लता घोगळे, मयुर घोगळे, वैशाली घोगळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments