Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशाळेची जागा संस्थानला देण्याबाबत कार्यवाही करू

शाळेची जागा संस्थानला देण्याबाबत कार्यवाही करू

उदय सामंत ; शाळा इमारत उभारणीसाठीही निधी देण्याची ग्वाही

कणकवली, ता.१८: शहरातील भालचंद्र आश्रम संस्थानलगत जि.प.शाळा क्र.3 आहे. शाळेची ही जागा संस्थानकडे वर्ग करणे. तर संस्थानकडील जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करून तेथे नवीन शाळा उभी करण्यासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
शहरातील शाळा क्रं.3 आणि भालचंद्र आश्रम संस्थान यांच्यामधील जागा वर्ग करणे, नवीन इमारत उभारणे आदी कामे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. या समस्यांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत यांनी भालचंद्र महाराज संस्थानमध्ये बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, भालचंद्र महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कामत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी रमेश पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे कणकवलीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते
शहरातील शाळा जि.प.च्या अखत्यारीत येत असल्या तरी शाळांची जागा नगरपंचायत हद्दीत आहे. शाळा क्रं.3 ची जागा हस्तांतरणाबाबत नगरपंचायतीने ठराव करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.सामंत यांनी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी आर.जे.पवार यांना दिले. तर संस्थानने त्यांच्याकडील जागा जि.प.शाळा उभारणीसाठी वर्ग केल्यानंतर, शाळेच्या नवीन इमारतीसाठी लागणारा आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल. शाळा उभारणीसाठी इथल्या स्थानिक आमदारांनी निधी दिला तर त्याबाबतही आपण राजकारण करणार नाही असे पालकमंत्री म्हणाले. याखेरीज आवश्यकता भासल्यास भालचंद्र महाराज संस्थानला देखील निधी देण्यास कटिबद्ध असल्याचे श्री.सामंत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments