Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याखासदार पुत्रावर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन

खासदार पुत्रावर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन

परशुराम उपरकर ; पावसात सेवा देणार्‍या पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न

कणकवली, ता.१८: भर पावसात अविरत सेवा देणारे पोलिस कर्मचारी विश्वजित परब यांना खासदार पुत्र गीतेश राऊत यांनी शिवीगाळ केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास मनसे आंदोलन करेल असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिला.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरुरकर, मेघन सरगळे आदी उपस्थित होते. श्री.उपरकर म्हणाले, खासदारांच्या मुलाला सत्तेचा माज आला आहे. त्यामुळेच वाहतूक पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. सत्तेच्या वापर करून पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रकार सध्या सुरू आहे. मात्र पोलिसांना शिवीगाळ करणार्‍या गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच हवा अशी मनसेची भूमिका आहे. सिंधुदुर्गात सत्ताधारी शिवसेनेची मंडळी मुजोरपणा करत असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहेत. मात्र अशा मुजोर सत्ताधार्‍यांना जनता जास्त काळ सहन करणार नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments