सर्जेकोट खाडीपात्रात बेपत्ता झालेल्या “त्या” मच्छीमाराचा मृत्यू

1440
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

मृतदेह आढळला; सहकारी मच्छीमारांना वाचविण्यासाठी गेला असता घडलेली घटना

मालवण
सर्जेकोट खाडीपात्रात नौका उलटल्याने बेपत्ता झालेल्या दिवाकर जानू देऊलकर या मच्छीमारांचा अखेर मृत्यू झाला.
त्याचा मृतदेह आज तळाशील किनारपट्टीवर चाळीस बंगला परिसरात आढळून आला.

काल सकाळी खाडीत मासेमारी करून परतत असताना जोरदार वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे देऊलकर यांची नौका उलटली होती नौकेतील चार मच्छीमार पाण्यात फेकले गेले. त्यांना वाचवण्यास गेलेली दुसरी नौका लाटांच्या तडाख्यात बुडाली.
दोन्ही नौकेवरील सुमारे आठ मच्छीमारांनी तासभर पोहत किनारा गाठला. अत्यावस्थ बनलेल्या दोघा मच्छीमारांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. यात दिवाकर जानू देऊलकर (वय २६) राहणार सर्जेकोट मालवण हा मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला होता. यातील बेपत्ता मच्छिमार दिवाकर याचा शोध घेण्याची काम सुरू होते आज सकाळी दिवाकर यांचा मृतदेह तळाशिल किनारपट्टीवर आढळून आला

\