आमदार केसरकरांच्या वाढदिवसाचे औचित्य; तीन टन खताचे वाटप…
सावंतवाडी ता.१९: आंबोली,चौकुळ व गेळे या गावावर माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचे प्रेम आहे.या गावाच्या विकासाबरोबरचं येथील प्रश्न सोडविण्यासाठी श्री.केसरकर हे सदैव कटिबद्ध आहेत.पर्यटनातून विकास व्हावा हा ध्यास त्यांनी घेतला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी केसरकरांनी केलेले नियोजन आणि त्यासाठी आणलेला विकास निधी दूरदृष्टी दर्शवित राहील,असे प्रतिपादन शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे व्यक्त केले.श्री.केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबोली चौकुळ गावात तीन टन खताचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आंबोली परिसरातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर,महिला जिल्हाध्यक्षा जानवी सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राघोजी सावंत, रूची राऊत, अपर्णा कोठावळे, गितेश राऊत, प्रशांत कोठावळे, सागर नाणोसकर, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, योगेश नाईक आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.