केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा…

785
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अतुल काळसेकर; सूक्ष्म,लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उत्पादकांना मिळणार लाभ…

कणकवली, ता.१९ : केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उत्पादक तसेच सेवा पुरविणारे व्यावसायिक यांच्यासाठी आत्मानिर्भर भारत योजना सुरू केलेली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन भाजप नेते अतुल काळसेकर यांनी केले आहे.
श्री.काळसेकर यांनी म्हटले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कोविड 19 आपत्तीच्या पार्श्वभूमीवर MSME अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम स्वरूपाचे उत्पादक तसेच सेवा पुरविणारे व्यावसायिक यांच्यासाठी आत्मानिर्भर भारत योजना सुरू केलेली आहे.या योजनेमुळे देशातील अनेक छोट्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार असून, जिल्ह्यातील अश्या प्रकारचे उद्योजक सुद्धा या प्रतिकूल परिस्थितीत आपला व्यापार उदीम चांगल्या पद्धतीने सुरू ठेवू शकतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असून त्यासाठी पुढील लिंकवर https://www.mh-indpkg.in आपण अर्ज करावा ही लिंक राज्य शासनाने तयार केली असून ऑनलाईन केलेला अर्ज संबंधित जिल्हा उद्योग केंद्राला पाठवण्यात येणार आहे तेथे त्या अर्जाची संपूर्ण छाननी करून त्यात काही अडचण असल्यास लाभार्थ्याला कळवण्यात येऊन त्या अडचणी चे निराकरण केले जाईल व केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेचा उद्योजकांना फायदा मिळेल तरी ज्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी वर दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करावा असे आवाहन भाजपा आत्मनिर्भर योजनेचे जिल्हा संयोजक व सिंधुदुर्ग बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केले आहे.सिंधु आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून श्री अतुल काळसेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यापूर्वीच या योजनेबाबत उद्योजकांमध्ये जनजागृती सुरू केलेली आहे.
यातील ठळक तरतुदी या पुढील प्रमाणे असणार आहेत.
जे आपले बांधव सूक्ष्म,लघु आणि मध्यम अर्थात …
एम एस एम ई अंतर्गत उत्पादक आहेत किंवा सेवा व्यावसायिक आहेत त्यांना या पॅकेजच्या व्याप्तीतून अधिक सक्षम होण्याच्या संधी मिळणार आहेत…
त्यांना मिळणार आहे आपले खेळते भांडवल वाढविण्याची संधी..
दिनांक 29 फेब्रुवारी 2020 पर्यंतच्या कॅश क्रेडिट प्लस टर्म लोन प्लस एक्सपांशन लोन यांच्या एकत्रित येणे बाकी रकमेवर 20 टक्के इतकी अधिक उचल..
तीही 7.25 टक्के ते 9.25 टक्के इतक्या माफक व्याजदराने त्यांना मिळणार आहे.आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणत्याही नवीन तारणाची गरज असणार नाही,तर ती शासनाची हमी रहाणार आहे.फक्त राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्जावरच ही उचल मिळणार असून, उद्योजकांना पहिल्या वर्षी फक्त व्याज भरणा करावयाचा आहे आणि उर्वरित चार वर्षात या कर्जाची पूर्ण परतफेड करावयाची आहे.
केंद्र शासनाच्या या आत्मनिर्भर योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा,त्यासाठी वर दिलेल्या लिंक द्वारे आपली नोंदणी करावी असे आवाहन श्री अतुल काळसेकर यांनी प्रसार माध्यमाद्वारे केलेले आहे.

\