अन्य सहकाऱ्यांनसमवेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश…
सावंतवाडी ता.१९: सांगेली येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ऍड गुरुनाथ आईर याच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आज जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर याच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी त्यांच्यावर सांगेली जिल्हा परिषद विभागिय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली.
तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी कामाचा झपाटा लावला असून आज सांगेली घोलेवाडी येथील युवा कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश घेतला.काँग्रेसपक्षाचे ध्येय धोरण विचारधारा आत्मसात करुन सर्वानी पक्षात प्रवेश केला.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.गावडे यांनी सर्वांचे स्वागत करत पक्षात स्वागत केले.दरम्यान येणाऱ्या काळात सर्वाना पक्षात योग्य मान्य सन्मान देण्यात येईल असेही श्री.गावडे यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रवक्ते संभाजी सावंत ,तालुका सरचिटणीस अभय केळकर, संजय राऊळ, समीर वंजारी ,गोपाळ राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत राऊळ ,दत्ताराम पवार ,विलास ईलेकर, संतोष राऊळ, संतोष तेली ,ज्ञानदेव घाटकर ,निलेश आईर ,सुभाष राऊळ ,दिलीप राऊळ, बाळकृष्ण देसाई ,अशोक राऊळ ,महेश सावंत ,पुरुषोत्मक वंचारी ,रुपेश आईर आदींनी पक्षात प्रवेश केला.