सावंतवाडी.ता,१९: येथील रोटरी क्लब अध्यक्षपदी डॉ.राजेश नवांगुळ,तर रोटरॅक्ट अध्यक्षपदी हर्षद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान आज झालेल्या पदग्रहण समारंभात मान्यवर प्रदीप जोशी यांच्या हस्ते श्री.नवांगुळ व श्री.चव्हाण यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला.
यावेळी रोटरीचे पूर्वीचे अध्यक्ष सुधीर नाईक यांनाही नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.यावेळी दिलीप म्हापसेकर,सचिन देशमुख,सुधीर नाईक,दादा कुडतडकर उपस्थित होते.
आपण समाजाचे देणं लागतो, ह्या भावनेने सर्वांना विश्वासात घेऊन समाजोपयोगी काम करणार असून मुलांचे आरोग्य व आरोग्य शिबिरे, शिक्षण, पर्यावरण संतुलन, यावर विशेष भर देणार असल्याचे डॉ.नवांगुळ यांनी सांगितले.
सांडपाणी व कचरा याच्यापासून खत निर्मिती करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट करण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून माझे सहकारी रॉटरॅक्ट अध्यक्ष हर्षद चव्हाण ऑनलाइन शिक्षणा करिता मदत करणार आहेत.
रोटरीच्या आरोग्य शिबिराकरिता माझे स्वतःचे हॉस्पिटल विना मोबदला देत असल्याचे या पद्ग्रहण समारंभात डाॅ.नवांगुळ यांनी जाहीर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजित देशमुख व प्रवीण परब यांनी सांगेली जिल्हा परिषद विभागिय अध्यक्षपदाची केले.
सावंतवाडी रोटरीच्या अध्यक्षपदी राजेश नवांगुळ तर राॅटरॅक्टच्या अध्यक्षपदी हर्षद चव्हाण…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES