मळगावातील “त्या” दोघा युवकांचा घातपात,बहीणीचा आरोप…

1387
2
Google search engine
Google search engine
Google search engine

चौघा मित्रांवर संशय; आडेली धरण पात्रात आढळून आले होते मृतदेह…

सावंतवाडी ता.१९: वेंगुर्ले-आडेली धरणामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या मिलिंद जाधव व अमोल मळगावकर या दोघा युवकांचा घातपात झाल्याचा संशय त्यातील एका युवकाची बहिण दिव्या दीपक कांबळे यांच्याकडुन
व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणी घटनेच्या दिवशी त्याच्या समवेत असलेल्या चार मित्रांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले.
त्या निवेदनात असे म्हटले आहे की, २४ जून रोजी आडेली धरणात मृतावस्थेत आढळलेल्या मिलिंद जाधव आणि अमोल मळगावकर या दोघा युवकांचा आदल्या दिवशी वाढदिवस होता.ते वाढदिवसा दिवशी पार्टीसाठी गेले होते,असे जरी म्हणणे असले तरी जाण्यापूर्वी माझा भाऊ मिलिंद जाधव याने मला तुमच्या घरी वाढदिवस साजरा करायचा आहे,असे सांगितले होते.तसेच मी परत येतो,असे सांगून तो निघून गेला,मात्र तो आला नाही.दरम्यानच्या काळात त्याच्या एका मित्राचा आपल्याला वारंवार फोन आला.तसेच मिलिंद हा तुझ्याकडे आला आहे का.? असे त्यांनी विचारले.तर त्यातीलच एका संशयिता सोबत आपला भाऊ मिलिंद याचे १ वर्षांपूर्वी भांडण झाले होते.त्यात त्याने मारहाण केली होती.ते या काळात ते बोलत नव्हते,असे असताना अचानक त्यांची मैत्री कशी काय जमते,असा सवाल करून त्यांनी बोलेरो पिकअप गाडीतून आपल्या भावांना धरणाकडे नेले,आणि पूर्वनियोजित कट करून त्यांचा घातपात केला,असा कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात संशय व्यक्त करण्यात आला आहे.तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

\