राष्ट्रवादीची मागणी; मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदन…
सावंतवाडी,ता.२०: कोरोना काळात झालेली नुकसानी लक्षात घेता, येथील पालिकेच्या व्यापारी संकुलात असलेल्या व्यापाऱ्यांच्या गाळ्याचे भाडे माफ करण्यात यावे, अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या वतीने येथील पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे करण्यात आली.
व्यापारी ग्राहक संघाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी उदय भोसले, हीदायतुल्ला खान, अशोक पवार, दत्तगुरु कामत, सत्यजित धारणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यात कोरोनाच्या आजारामुळे सर्वसामान्य व्यापाराची वाताहत झाली आहे. आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यामुळे गाळे व्यवसायिकांना थोडासा दिलासा देण्यासाठी तीन महिन्याचे भाडे माफ करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.