राज घराण्याकडून हिरवा कंदील; नगराध्यक्ष संजू परबांनी मानले आभार…
सावंतवाडी,ता.२०: येथील मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसुत कट्ट्यावरच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे.त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याने दिली आहे.याबाबत त्यांनी आमदार नितेश राणे यांना फोन करून कळवले आहे.या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी राजघराण्याचे आभार मानले आहे.याबाबतची पत्रकार परिषद घेऊन श्री.परब यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले,याबाबत चार दिवसापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राजवाड्यात जाऊन राजकारण्याची भेट घेतली होती.यावेळी आपला निर्णय काही दिवसात कळवू,असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले होते.यासंदर्भात काल राजकारण्यांकडून श्री.राणे यांना संपर्क साधून त्या ठिकाणी पुतळा होण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचे कळविले.यावेळी महाराजांच्या पुतळ्याकडे आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.दरम्यान या निर्णयाबाबत श्री.परब यांनी राजघराण्याचे आभार मानले आहेत.
यावेळी आरोग्य सभापती परीमल नाईक,नगरसेवक आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर,दिपाली भालेकर,नासिर शेख,समृद्धी विरनोडकर,उत्कर्षा सासोलकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.