महिन्यापूर्वी आले होते मुंबईतून; आरोग्य पथकाकडून परिसरात सर्व्हेक्षण…
कणकवली, ता.२०: शहरातील तेलीआळीतील राहणार्या एका ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतून आल्यानंतर ते एक महिना क्वारंटाईन होते. त्यानंतर दोन दिवसापूर्वी त्यांना धाप लागणे व इतर कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल काल (ता.19) कोरोना पॉझिटिव्ह आला.
तेलीआळी भागात रूग्ण सापडल्याने तेथील परिसर कंटेनमेंट झोन होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज आरोग्य पथकाने तेलीआळी भागाचे सर्व्हेक्षण केले. तसेच त्या ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.