वाळू लिलाव पट्ट्यातील तलाठी,सर्कल यांची चौकशी करा..

289
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बाळ कनयाळकर; व्यावसायिकांना त्रास देत असल्याचा आरोप

कुडाळ,ता.२०: वाळू लिलाव पट्ट्यातील प्रक्रियेत कार्यरत असलेल्या तलाठी, सर्कल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वाळू व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे त्यांची लाच लुचपत विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

मालवण-कुडाळ तालुक्यातील वाळू उपसा पट्ट्यात कार्यरत असलेले तलाठी व सर्कल हे मोठ्या प्रमाणात सहभागी असून वरिष्ठांच्या मर्जीनुसार राजरोस वाळू व्यावसायिकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात करून गेली अनेक वर्षे भ्रष्टाचार चाललेला आहे. आणि जिल्हा प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
वाळू वाहतूकीतील भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या संपत्तीचा लाभ महसूलच्या वर पासुन ते खालपर्यंतच्या अधिकार्‍यांचा सहभाग आहे. त्यामुळेच तलाठी व सर्कल वरिष्ठांच्या आशिर्वादानेच वाळू व्यावसायिकांची लूट करतात.ह्या भ्रष्टमायेमुळे वाळू लिलाव पट्ट्यातील महसूलचे अधिकारी तलाठी.सर्कल हे गब्बर झाले असून वाळू व्यावसायिक कंगाल झालेले आहेत.हे जर थांबले नाही तर या वाळू व्यावसायिकांवर आत्महत्या करण्या पलिकडे मार्ग नाही. *आई जेऊ घालीना बाप भिक मागू देईना.* अशी अवस्था महसूलच्या अधिकार्‍यांनी वाळू व्यावसायिकांची करून ठेवली आहे.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी करतो की, वाळू लिलाव पट्ट्यातील कार्यरत महसूलचे तलाठी व सर्कल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी करा आणि सत्य जनतेसमोर आणा.तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न्याय मागण्यांसाठी आंदोलन पुकारेल.तरी जिल्हाधिकारी यांनी आमच्या मागणीचा विचार करून हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे सोपवावे.अशी मागणी सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी केली आहे.

\