सिंधुदुर्गात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम…

188
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.२०: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी चा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्त जिल्हाभर रक्तदान शिबिरे,वृक्ष लागवड आणि प्रत्येक शाखेवर शिवसेनेचा भगवा झेंडा उभारून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते व जि.प गटनेते नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस 27 जुलै रोजी असून हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचे त्यांच्या आदेशानुसार ठरविण्यात आले आहे त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच या व्यतिरिक्त विविध ठिकाणी वृक्ष लागवड व वृक्ष वाटप कार्यक्रमाबरोबरच प्रत्येक गावातील शिवसेना शाखेच्या कार्यालयावर भगवा झेंडा फडकविण्यात येणार आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताची गरज ओळखून रक्तदान शिबिरे आयोजित करून मोठ्या प्रमाणात रक्त उपलब्ध करून देण्याचा मानस आहे त्यानुसार प्रत्येक शिवसैनिकाला तसेच नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ही रक्तदान शिबिरे देवगड मध्ये 27 जुलै ,वैभव वाडी 28 जुलै ,दोडामार्ग 29 जुलै ,सावंतवाडी 30 जुलै ,वेंगुर्ला 31 जुलै ,कुडाळ 1 ऑगस्ट ,मालवण 2 ऑगस्ट तर कणकवली येथे नुकतेच रक्तदान शिबिर पार पडल्याने त्या ठिकाणी वृक्ष वृक्ष लागवड व शेतकऱ्यांना जायफळ, दालचिनी ,काजू वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे

जिल्ह्यातील महामार्गाचे काम सुरू असून या कामामुळे महामार्गालगत ची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागली यामुळे जिल्ह्याचे सौंदर्य हरवले आहे त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी ओसरगाव येथे हायवे शेजारी मोठ्या प्रमाणात आंबा ,काजू ,कोकम, जांभूळ आदी प्रकारची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे तसेच महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या डीवाईडर वर पहिल्या टप्प्यात कुडाळ ते झाराप आणि दुसऱ्या टप्प्यात कुडाळ ते कसाल या भागात वेताळ-बांबर्डे येथील वेलंकनी फार्म या संस्थेमार्फत सोनचाफ्याची झाडे लावण्यात येणार आहेत तसेच त्यांची संगोपनही हीच संस्था करणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी दिली तसेच 27 जुलै रोजी गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे शिवसेनेचा भगवा झेंडा लावण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे त्यामुळे या संपूर्ण उपक्रमात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी तसेच नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी शिवसेना जि प गटनेते नागेंद्र परब यांनी केले आले

\