आता…दोडामार्ग तालुक्यात सुद्धा कोवीड सेंटर सुरू…

186
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग, ता.२०:गणेशोत्सवासाठी तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या लक्षात घेवून दोडामार्ग येथील आयटीआय मध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.त्यासंदर्भातील सगळी तयारी पूर्ण झाली असून त्या सेंटरमध्ये आजपासून स्वॅब गोळा करण्यात येणार आहेत.स्वॅब गोळा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.आठ प्रकारच्या व्यक्तींचे स्वॅब तिथे घेतले जाणार आहेत.
गोळा केलेले स्वॅब दररोज दुपारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.तपासणी अहवाल तीन दिवसांत मिळणार आहे.अहवाल येईपर्यंत त्या व्यक्तीला त्याच सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे.दरम्यान, तालुक्यातील अनेक तरुण कामानिमित गोव्यात जातात. त्यांना स्वॅब तपासणीसाठी गोवा सीमेवर दोन हजार रुपये भरावे लागतात. त्या तरुणांची स्वॅब तपासणी शासनाने दोडामार्गमधील कोविड सेंटरमध्ये करुन अहवाल द्यावा, जेणेकरून त्यांचा गोव्यात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याची कार्यवाही तत्काळ व्हावी अशी मागणी युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे.

\