संजय पडते; आगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमच्याच पक्षाचा…
सिंधुदुर्गनगरी ता.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना झपाट्याने वाढत असून शिवसेनेत प्रवेश करणारे अनेक जण आपल्या संपर्कात आहेत,लवकरच या सर्वांना शिवसेनेत सन्मानाने प्रवेश देऊन त्यांचा सन्मान केला जाईल, तसेच आगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच असेल,असे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर चांगले निर्णय घेत कोरणा साथीवर नियंत्रण मिळवले आहे शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा होणारा विकास आणि शिवसेना नेत्यांच्या कार्यपद्धतीला आकर्षित होत अनेक जण शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचे या वेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी स्पष्ट केले तर या इच्छुक कार्यकर्त्यांना लवकरच शिवसेनेमध्ये सन्मानाने प्रवेश दिला जाईल मूळ शिवसैनिक असलेले कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेत येत असल्याने शिवसेना जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल असेही यावेळी पडते यांनी स्पष्ट केले
कणकवली येथे महामार्ग चौपदरीकरण संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत माजी आमदार प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली तर महामार्ग चौपदरीकरणासाठी आपण सर्व काही केले असे सांगत आयत्या बिळात नागोबा बनून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात विद्यमान खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर ,यांच्या प्रयत्नामुळे महामार्गाचे काम मार्गी लागले आहे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर महामार्गाचे काम मंजूर करून घेतले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे निधी मिळावा आणि दर्जेदार काम व्हावे याबाबत त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती असे असताना माजी आमदार प्रमोद जठार हे आता महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असताना फुकाचे श्रेय घेण्यासाठी आयत्या बिळावर नागोबा बनले आहेत जणूकाही आपणच सर्व काही केले आणि यापुढे आपणच सर्व काही करणार या अंतर भावात ते वावरत आहेत मात्र त्यांच्या आमदारकीच्या काळात माजी आमदार जठार यांनी अनेक आश्वासने दिली भीष्मप्रतिज्ञा केल्या त्याचे काय झाले ?हे त्यांनी आत्मपरीक्षण करावे त्यानंतरच खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका करावी येथील जनतेच्या मागणीनुसार खासदार राऊत यांनी आवश्यक त्या ठिकाणी बॉक्स वेल ,उड्डाणपूल सुचवली आहेत तर महामार्गात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची चांगल्या प्रकारे भरपाई मिळवून दिली आहे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याने जनतेने त्यांना तब्बल दोन वेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले आहे त्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये जनता सर्वकाही ओळखून आहे असा टोला यावेळी संजय पडते यांनी लगावला यावेळी जि प गटनेते नागेंद्र परम उपस्थित होते