कणकवलीत सहयोगिनी सेवा मंडळातर्फे शहरात वृक्षारोपण

80
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२०: सहयोगिनी सेवा मंडळातर्फे कणकवली शहरात वृक्षारोपणाचा उपक्रम आज राबविण्यात आला. यात शहराच्या विविध प्रभागात वृक्ष लागवड करण्यात आली.पर्यावरणाचे समतोल राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्याअनुषंगाने हा उपक्रम राबविल्याची माहिती सहयोगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा दीपा सरुडकर यांनी दिली.
शहरातील गणपती साणा, नाना-नानी पार्क, जिल्हा परिषद शाळा नंबर 3, विद्यामंदिर शाळा, रवळनाथ मंदिर, स्वयंभू मंदिर, राम मंदिर या परिसरात बेल, जांभूळ, आंबा, बदाम, कडुनिंब, जाम, चिंच यासह विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड केली.त्यासाठी रवळनाथ मित्रमंडळाच्या सदस्यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी उपाध्यक्ष स्वाती पोयेकर, शुभांगी उबाळे, अन्नपूर्णा आवटी, विद्या टकले, सौ.सुतार आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

\